या तीन युवतींनी उडविली सरकारची झोप!

pooja zole, pooja more, sharmila yevale
pooja zole, pooja more, sharmila yevale

पुणे : विरोधी पक्षातील प्रस्थापित नेते हे सत्ताधारी असलेल्या भाजप किंवा सेनेत जाण्यासाठी रांगा लावून असताना सरकारविरोधात लढण्यासाठी सामान्य घरातील युवती आक्रमक झाल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्याने मुख्यमंत्रीची झोप उडवली आंहे. अकोले या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशी यात्रेच्या ताफ्यावर शाई फेकून आंदोलन करत `मुख्यमंत्री गो बॅक` ची घोषणा देणारी शर्मिला येवले ही आक्रमक झाली होती.

सरकारने गड व किल्ल्यांच्या खासगीकरणाबाबत जो निर्णय घेतला त्या निर्णयाला विरोध करत सिंहगडावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट करणारी पूजा झोळे हो शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती आहे तर शेतकरी संघटनेची युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे हिने ही या आधी महाजनादेश यात्रेत मराठवाड्यात गोंधळ घातला होता.

या तीन रणरागिणी शेतकरी संघटनेच्या असल्या तरी सरकार विरोधात आक्रमक आहेत. या तीन युवतींनी सरकारविरोधात वेगळे व आक्रमक पाऊल उचलून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्या आता सरकारच्या नजरेखाली आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या परिसरात कोठेही सरकारचा कार्यक्रम असेल तर पोलिसांची त्यांच्यावर बारीक नजर असते. थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच त्या घुसण्याचा प्रयत्न करण्याचा धोका असल्याने पोलिस योग्य ती खबरदारी घेत आहेत. 

पूजा झोळे : मूळची करमाळा (जि. सोलापूर). एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून आता वकिलीचे शिक्षण घेत आहे. गेली आठ वर्षे योग शिक्षिका, विद्यार्थी संघटना आंदोलने,तसेच मराठा क्रांती मोर्चामध्ये कार्य. सरकारे महाराष्ट्राची अस्मिता असणारे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला त्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट केला.

पूजा मोरे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती अध्यक्षा असून आता त्या गेवराई पंचायती समिती सदस्या आहेत. मूळच्या त्या गेवराईच्या आहेत.

शर्मिला येवले :MA (मराठी) फर्ग्युसन महाविद्यालय शिक्षण घेत आहे. B. Sc. (computer science) तिने पदवी मिळवली आहे.मुळगाव इंदुरी (ता.अकोले, जि. नगर). सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी माझ्या तालुक्यात झाली नाही. त्या कारणाने जनतेचे अतोनात हाल होत आहेत. ही सत्य परिस्थिती शासन दरबारी मांडण्यासाठी मी आक्रमक पवित्रा घेतल्याचा शर्मिलाचा दावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com