तीन पक्ष एकत्र आल्याने महाराष्ट्रात राजकारणाचा पचका झाला - रामदास आठवले

कॉंग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देईल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्यामुळे गाफील राहिलो. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्याने हे सरकार अजिबात टिकणार नाही. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाचा पचका झाला आहे असे केंद्रीय समाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी निरीक्षण नोंदवले.
three party makes maharashtra politics worse observes ramdas athawale
three party makes maharashtra politics worse observes ramdas athawale

नाशिक - कॉंग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देईल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्यामुळे गाफील राहिलो. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्याने हे सरकार अजिबात टिकणार नाही. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाचा पचका झाला आहे असे केंद्रीय समाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी निरीक्षण नोंदवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 90 व्या स्मृतीदिनानिमित्त आज श्री. आठवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यासाठी ते आले होते. "मनसे'प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याने विचका झाला असे म्हटले होते. याविषयी श्री. आठवले यांना विचारले असता, माझ्या मते विचका नव्हे तर पचका झाला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन केले. भाजपशी काडीमोड केली. मात्र राज्य सरकार ज्या पध्दतीने काम करीत आहे ते योग्य नाही. देवेंद्र फडणवीस सरकारचे सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. हे काही योग्य नाही. यापूर्वीही सरकार बदलले त्यांनी कधी असे केले नाही. उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय चांगले घेतले तरीही हे सरकार फार काळ टिकेल असे मला वाटत नाही. कारण त्यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.

ते म्हणाले, सीएए हा अत्यंत चांगला कायदा आहे. त्यात केवळ सहा धर्माच्या घटकांना व तीन देशांतील लोकांना नागरीकत्व देण्याचा विषय आहे. मुस्लीम समाजाशी त्याचा काहीही संबंध नाही. "एनआरसी' केवळ आसाम राज्याशी संबंधीत आहे. त्यामुळे आम्ही या कायद्याला राज्य सभेत समर्थन दिले. मी त्याचा पाठीराखा आहे. मात्र यानिमित्ताने कॉंग्रेस पक्षाला मुस्लीम समाजाची दिशाभूल करण्याची संधी मिळाली. त्यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल केली आहे. त्यातूनच नवी दिल्लीत दंगल झाली. त्यात 38 नागरीकांचा बळी गेला. अनेक जखमी झाले. कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीचा सहभाग आहे असा माझा संशय आहे.

यावेळी काकासाहेब खंबाळकर, माजी मंत्री अविनाश महातेकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com