कोरोना: पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांना केले सस्पेंड!

परदेशातून आल्यानंतर या तीन आधिकाऱ्यांनी कार्यालयात रूजू न होता विलगीकरण कक्षात जायला हवे होते. किंवा स्वत:ला घरीच विलग करणे आवश्‍यक होते.
three officers suspended in pune corporation due to corona guidelines
three officers suspended in pune corporation due to corona guidelines

पुणे : ऑस्ट्रेलियावरून आल्यानंतर कोरोना संसर्ग होऊ नये याची कोणतीही काळजी न घेता थेट कामावर रूजू होणाऱ्या पुणे महापालिकेतील तीन आधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी दिले. महापालिकेच्या कामानिमित्त हे तीन आधिकारी ऑस्ट्रेलियाला गेले होते. या दौऱ्यावरून आल्यानंतर ते शनिवारी कामावर रूजू झाले.

परदेशातून आल्यानंतर या तीन आधिकाऱ्यांनी कार्यालयात रूजू न होता विलगीकरण कक्षात जायला हवे होते. किंवा स्वत:ला घरीच विलग करणे आवश्‍यक होते. मात्र, यातील काहीच न करता हे आधिकारी महापालिकेच्या कामकाजात सहभागी झाले. या प्रकाराच्या गांभीर्याची त्यांना कल्पना देण्यात आली. त्यांना विलगीकरण कक्षात किंवा घरीच विलग राहण्यास सांगण्यात आले. मात्र, यातील काहीच न करता सलगपणे ते कार्यालयात येऊ लागले. प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परदेशातून आल्यानंतर अशा प्रकारे विलग राहणे आवश्‍यक असल्याबाबत कल्पना नव्हती, अशी सबब या तीनही आधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडताना दिली. मात्र, या प्रकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी आज या तीन आधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com