कऱ्हाडात कोरोनाची साखळी तुटेना; नव्‍याने तिघेजण पॉझिटीव्ह

कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची, वनवासमाची, मलकापूर-आगाशीवनगर परिसरात रूग्ण वाढू लागले आहेत. यामध्ये बहुतांशी रूग्ण हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत.
corona satara
corona satara


सातारा / कराड : कोरोनाचा संसर्ग वाढत असून २४ तासात कऱ्हाडात तीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली असून कोरोनाची साखळी तुटेना. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे. कऱ्हाड, मलकापूर शहरासह तीन किलोमीटर परिघातील सर्व उपनगरे सील केली असली तरीही संसर्ग वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची, वनवासमाची, मलकापूर-आगाशीवनगर परिसरात रूग्ण वाढू लागले आहेत. यामध्ये बहुतांशी रूग्ण हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात
आलेले आहेत.

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे. कालपर्यंत १८ कोरोनाबाधितांची संख्या आज दुपारी दोनवाजेपर्यंत २२ झाली आहे. कऱ्हाड शहराशेजारील मलकापुर परिसरातील आगाशिवनगरमध्ये आज आणखी दोघांना तर वनवासमाची येथील एक महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाकडुन आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले. कऱ्हाडमध्ये एकुण रुग्णांची संख्या ११ झाली आहे. एकाच दिवशी आज तब्बल तीन रुग्ण सापडल्याने शहरासह मलकापुर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

आवश्य वाचा : नितीन राऊत सोनिया गांधींना म्हणाले....माँ तुझे सलाम!
 
 कऱ्हाड तालुका हा सध्या कोरोनासाठी हॉटस्पॉटच बनला आहे. सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. तालुक्यात पहिल्यांदाच तांबवे येथे बाधित रुग्ण सापडला. त्याच्यावर उपचार करुन तो बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच दरम्यान हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधित झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. 

त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. आता त्यांच्यापासुन बाधित रुग्णांची साखळी वाढु लागली आहे. आज संबंधितांच्या संपर्कातील आणखी तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये मलकापुर-आगाशीवनगर परिसरातील दोन पुरुष तर वनवासमाचीतील पहिल्या रुग्णाच्या कुटुंबातील एका महिलेचाचा समावेश आहे.

आगाशिवनगर व वनवासमाचीतील संबंधित दोघे हे बाबरमाची येथील बाधीताच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आज सापडलेल्या मलकापुर-आगाशिवनगर परिसरातील संबंधितांच्या संपर्कातील कुटुंबीय आणि अन्य काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासन, आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरासह मलकापुर आणि तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com