बेपत्ता आमदार नितीन पवार म्हणाले...मुंबईला येऊन मी माझी चुक सुधारली!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बेपत्ता असलेले तीन आमदार दौलत दरोडा आणि नाशिकचे नरहरी झीरवाळ, नितीन पवार हे काल रात्री नवी दिल्लीतून विमानाने मुंबईला परतले. तेथे त्यांना घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गेले होते. मुंबई विमानतळावरुन ते थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलवर गेले. नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
Nashik NCP MLA Nitin Pawar Says I ractified my mistake
Nashik NCP MLA Nitin Pawar Says I ractified my mistake

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 'नॉट रिचेबल' आमदार काल रात्री मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले. यातील नितीन पवार यांनी आपल्या घरी दुरध्वनी केला. "मला जी माहिती देण्यात आली त्याने माझा गोंधळ झाला. त्यामुळे मी दिल्लीला गेलो. मात्र आता सर्व स्थिती समजल्यावर परतलो'' असे त्यांनी घरच्यांना सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बेपत्ता असलेले तीन आमदार दौलत दरोडा आणि नाशिकचे नरहरी झीरवाळ, नितीन पवार हे काल रात्री नवी दिल्लीतून विमानाने मुंबईला परतले. तेथे त्यांना घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गेले होते. मुंबई विमानतळावरुन ते थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलवर गेले. नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यानंतर यातील आमदार पवार यांनी नाशिकला आपली पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यासाठी आम्हाला निरोप मिळाले होते. त्यामुळे मुंबईला निघालो होतो. त्याबाबत चुकीचा समज झाल्याने आम्ही विमानाने दिल्लीला गेलो. तेथून आम्ही नोएडा येथे मुक्काम केला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत वाहिन्या आणि वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे सुरु असलेला राजकीय गोंधळ समजला. त्यामुळे काल आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतत्वासमवेतच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एका मित्राची मदत घेतली. त्याला विनंती केल्याने त्याने नवी दिल्लीहून मुंबईला येण्याची व्यवस्था केली. आता आम्ही सुखरुप आहोत काहीही काळजी करु नये, असे त्यांनी सांगितले.

काल रात्री आमदार झीरवाळ आणि पवार दोघेही परतल्याने जिल्ह्यातील सर्व सहा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरवातीला चार आमदार 'नॉट रिचेबल' झाले होते. त्यामुळे पक्षाकडून शोधाशोध सुरु केली गेली. त्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहिम हाती घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com