जामखेडमधील 'त्या' तिनही मशिदी सील

जामखेड हे 'कंटामिनीट झोन' म्हणून पुढे आले असल्याने काझी मशिदीच्या परिसरातील एक किलोमीटर व्यासाच्या परिघातील रहिवाशांवर 14 दिवस आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहे.
three masjid sealed in jamkhed due to corona outbreak 
three masjid sealed in jamkhed due to corona outbreak 

जामखेड (नगर) : जामखेड येथील काझी मशिदीमध्ये आढळलेल्या दोन परदेशीय करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्याची दोन दिवसात प्रशासनाने शोधाशोध करून अनुक्रमे 18 व 13 असे मिळून 31 व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेऊन जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले आहे. तसेच जामखेडमधील तीनही मशिदी सील केल्या आहेत. 

जामखेडमधील काझी मशिदीमध्ये सार्वजनिक नमाज पठण करताना 14 जण पोलिसांना 26 मार्चला आढळून आले होते. त्यांना कोरांटाईनसाठी नगरला पाठवण्यात आले होते. यापैकी दोघेजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तींच्या संपर्कामध्ये जामखेड येथील 31 स्थानिक व्यक्ती आल्याचे प्रशासनाला प्रथम दर्शनी आढळून आले. त्यांनाही प्रशासनाने ताब्यात घेवून नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले.

या कोरोनाबाधित दोन्ही व्यक्ती जामखेडमध्ये काही दिवस वास्तव्यासाठी होत्या. या काळात त्यांच्यासोबत राहिलेले तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची प्रशासनाने शोधाशोध करून त्यांना ताब्यात घेऊन नगरला पाठवलेले आहे. जामखेडमधील काझी मज्जीदमध्ये आढळून आलेल्या दोन परदेशातील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारीची उपाय योजना म्हणून जामखेडमधील तिन्ही मशिदी सील केल्या आहेत. पाटोदा येथील मशीद देखील सील केली आहे.

जामखेड हे 'कंटामिनीट झोन' म्हणून पुढे आले असल्याने काझी मशिदीच्या परिसरातील एक किलोमीटर व्यासाच्या परिघातील रहिवाशांवर 14 दिवस आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com