shirgaonkar
shirgaonkar

DySP शिरगावकर झाले कडक : लॉकडाऊनचे पालन न केलेल्यांना राज्यात पहिल्यांदा शिक्षा

पोलिसांनी आता घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.

बारामती : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन न केल्याबद्दल येतील न्यायालयाने तिघांना तीन दिवस कैद किंवा पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अफजल बनिमिया आतार (रा. श्रीरामनगर, बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा (रा. सूर्यनगरी, बारामती) व अक्षय चंद्रकांत शहा (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) या तिघांना ही शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. भविष्यात चारित्र्य पडताळणी किंवा शासकीय खाजगी नोकरीवर गदा येणार आहे. पासपोर्ट, शस्त्रपरवाना तसेच व्यवसाय परवाने मिळवितानाही या शिक्षेने अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी शासकीय लॉकडाऊनचे पालन करावे, बाहेर विनाकारण न फिरता घरातच राहिले पाहिजे, अन्यथा अशा नागरिकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शिरगावकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com