पुण्यात 24 तासांत तीन मृत्यू : परदेशी प्रवास नसतानाही कोरोनात बळी गेल्याने चिंता

पुण्यातील एकूण बळी पाच जणांचा गेल्याने आता आणखी सतर्क राहावे लागणार आहे.
corona12
corona12

पुणे : पुण्यात कोरोनाचा  24 तांसात  तिसरा बळी गेला आहे. पुण्यातील झोपडपट्टीत राहाणाऱ्या  वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील एका महिलेला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी हा तिसरा मृत्यू होता. 

साठ वर्षांतील एका वृद्धाचा ससूनमध्ये, 52 वर्षीय एका नागरिकाचाही ससूनमध्ये आणि 68 वर्षीय ज्येष्ठाचा औंध रुग्णालयात मृत्यू झाला. 

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या पाचवर पोहोचली आहे. पाचही मृत्यू झालेल्या रुग्णांचा परदेशी प्रवास झालेला नव्हता. स्थानिक संसर्गातून कोरोना झाला आणि त्यातून मृत्यू ओढवल्याचे दिसून येते.

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांना हवेय विमा संरक्षण : कोल्हे

लॉकडाऊनच्या काळात जनतेला एलपीजी गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या आणि पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचा विमा उतरविण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतानही नागरिकांना घरपोच एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी देशभरातील विविध गॅस एजन्सीचे कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांमध्ये कायमच असुरक्षितेची भावना असते. शिवाय गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम करणारे कर्मचारी असंघटीत क्षेत्रातील असून त्यांच्या कमाईवर त्यांचे कुटुंब गुजराण करत असते. अशावेळी जर कोरोनाचा संसर्ग झाला आणि दुर्देवाने कुणी कर्मचारी दगावला तर त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. हीच परिस्थिती पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांच्यासह आरोग्य सेवेतील विविध कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला अतिशय चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन खासदार डॉ. कोल्हे यानी केले. तसेच याच धर्तीवर एलपीजी सिलिंडर पोहोचविण्याचे काम करणारे व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी यांनाही ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com