खैरेंच्या राज्यसभेसाठी तीन आमदारांनी शब्द टाकला होता, पण...

डॉ. कराड हे माझे शेजारी आहेत, अनेक वर्षांपासूनचे आमचे संबंध आहेत. एवढी छोटी गोष्ट मोठी करण्याची गरज नाही.
three assembly members lobbing for chandrakant khaires candidature
three assembly members lobbing for chandrakant khaires candidature

औरंगाबादः : राज्यसभेवर संधी देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी माझ्यासह आमदार प्रदीप
जैस्वाल, संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती, असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्यसभेसाठी पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच खैरेंनी ठाकरे घराण्यातील व्यक्तीवर नाव घेऊन टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. त्यानंतर चार दिवस खैरे नॉटरिचेबलही होते. त्यातच भाजपने डॉ. भागवत कराड यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर संधी दिली आणि अंबादास दानवे यांनी त्यांचे पेढा भरवत अभिनंदनही केले. त्यामुळे खैरे आणि दानवे यांच्यात वाद असल्याचे समोर आले होते.

आजच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी या घटनेचा उल्लेख करतांनाच खैरेंना राज्यसभेवर संधी मिळावी यासाठी आपण कसे प्रयत्न केले याचा उल्लेख केला. दानवे म्हणाले, खैरे यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. राज्यसभेवर संधी मिळाली नाही म्हणून, भावनेच्या भरात ते बोलले. त्यानंतर त्यांना पश्‍चतापही झाला, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे. खैरे यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून माझ्यासह शहरातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्यच करावा लागतो.

डॉ. भागवत कराड यांना पेढा भरवून अभिनंदन केल्याचे कोणाला रुचले नाही, याबाबत पक्षाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा खैरे यांनी दिला होता. यावरही डॉ. कराड हे माझे शेजारी आहेत, अनेक वर्षांपासूनचे आमचे संबंध आहेत. एवढी छोटी गोष्ट मोठी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र पुढारलेले राज्य आहे असे म्हणत खैरेंचे नाव न घेता टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com