मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी -मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असताना गृहविभागाल एक पत्र प्राप्त झाले असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात भादंवि कलम 506(धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असताना गृहविभागाल एक पत्र प्राप्त झाले असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात भादंवि कलम 506(धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर भाजपा ईडी, सीबीआयची भीती घालून या नेत्यांवर दबाब आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.गृहविभागाच्या कक्ष अधिकाऱ्याला प्राप्त झालेल्या या पत्रात मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्राची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या नावे एक गोपनीय पत्र 15 ऑक्‍टोबर रोजी प्राप्त झाले होते. या पत्राची दखल घेत हे पत्र पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. तेथून हे पत्र परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे पाठवून गुन्हा दाखल करण्यात आला.

या पत्रात असणारा मजकूर हा मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्‍यातल्या एका गावातून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे पत्र आलेले आहे. असा दावा पत्रात करण्यात आला आहे. या पत्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका पोचवण्याची धमकी देण्यात आलेली आहे.

"तुम्ही नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणत आहात. आपण अनेक पक्ष फोडले आहे, हे काही मला पटलेले नाही. आपल्या सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या व्यापारी कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मी निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्या गावात जो कोणी तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरकला तसेच भाजपाचा झेंडा हातात दिल्यास व ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून इन्कांउंटर करू" अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. या पत्रात व्यक्तीने स्वतःचे नाव व पत्ता दिला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अडवकण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com