विखेंच्या डावपेचांना बाळासाहेब थोरात पुरून उरले

थोरातांना पराभूत करण्याचे विखेंचे स्वप्न अधुरे
विखेंच्या डावपेचांना बाळासाहेब थोरात पुरून उरले

नगर ः संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी होणार हे निश्चित होते, मात्र विरोधकांनी विशेषतः भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष विरोध केल्यामुळे या मतांमध्ये घट होईल, अशी शक्यता होती, तथापि, थोरात यांच्या मतांमध्ये उलट वाढच झाली. त्यामुळे थोरातांचा बालेकिल्ला शाबूत असल्याचे स्पष्ट झाले.

या निवडणुकीत थोरात यांना एक लाख २५ हजार ३८० मते मिळाली. शिवसेनेचे साहेबराव नवले यांना केवळ ६३ हजार १२८ मतांवर समाधान मानावे लागले. ६२ हजार २५२ मताधिक्याने थोरात विजयी झाले.

या मतदारसंघात विखे पाटील यांनी विशेष विरोध केल्याने प्रारंभी वातावरण काहीसे बदलले होते, तथापि, नंतर विखे यांनीच प्रबळ उमेदवार न दिल्याने काही तरी सेटलमेंट झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विखेंचा विरोध जवळजवळ मावळला. त्यामुळे थोरात निर्विवाद येणार, हे निश्चित झाले होते. अपेक्षेप्रमाणे थोरात यांना चांगले मते मिळून ते विजयी झाले. मागील २०१४ च्या निवडणुकीत थोरात यांना एक लाख तीन हजार ५६४ मते मिळाली होती. या वर्षी त्यात वाढ झाली असून, तालुक्यातील जुने मतदार रोखण्यात थोरात यांना यश आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com