राज्यपालांनी यातून मार्ग काढावा - बाळासाहेब थोरात

 राज्यपालांनी यातून मार्ग काढावा - बाळासाहेब थोरात

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा यांच्यातील वादंगामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यातून काय मार्ग काढत आहेत याकडे आमचे सगळ्यांचे लक्ष आहे असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेण्यासाठी आलो होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

थोरात यांच्याबरोबर कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे. आमच्याकडे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत आम्ही कुठलीही रणनिती ठरवलेली नाही असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com