thorat and devendra phadanvis | Sarkarnama

नवीन ज्योतिषी शोधा..., फडणवीसांना थोरातांचा सल्ला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जानेवारी 2020

नगर : " भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांच्या सर्वच भविष्यवाणी फेल ठरत आहेत. विधासभा निवडणुकीत 220 च्यावर जागा येईल, मी पुन्हा येईल, महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा,"" असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. 

नगर येथे पत्रकार परिषेदेत थोरात बोलत होते. ते म्हणाले,""राज्यातील सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांमध्ये सहजता आणणे हा उद्देश आहे. त्यात मालमत्तासंदर्भात नागरिकांना लागणारी कागदपत्रे सहजतेने उपलब्ध होऊ लागली आहे. मागील सरकारच्या काळात यात गती राहिली नाही. जवाहर नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी पुरोगामी विचारांचे आहे. कॉंग्रेसची राजनीतीही राज्यघटनेला धरून आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. हा घटनेचा आपण निषेध करतो. नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ नये, या मताशी आम्ही ठाम आहे. 

भाजपच्या अधोगतीला सुरुवात 
थोरात म्हणाले, विरोध करणे हा एकमात्र विरोधकांचा पिंड आहे. भाजपने आयारामांची मोठ्या प्रमाणावर आवक केली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीवरून सध्या राज्यात भाजपमध्ये हाणामारी सुरू आहे, भाजप सरकारची अधोगतीला सुरवात झाली आहे, अशी टीका थोरात यांनी केली. 

नूतन इमारतीचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावू 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम 90 टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम हे 28 कोटींच्या निधीअभावी मागील पाच वर्षांत रखडले आहे. मात्र, नूतन इमारतीचा पायाही आपणच खोदला, त्याचा कळसही आपणच उभारणार आहोत. लवकरच नूतन इमारतीच्या निधीचा प्रश्‍न मार्गी लागेल, इमारतीचे उद्‌घाटनही आपल्याच हातून होईल, असा ठाम विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख