यवतमाळ जिल्हा बॅंक निवडणूक; आता तिसऱ्या आघाडीचे आव्हान

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्याजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्राधिकरणाने जाहीर केला आहे. येत्या 26 मार्चला बॅंक संचालकांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अंतिम मतदारयादी आज शनिवार (ता. 15) प्रसिद्ध होणार आहे
Third Front May Enter Yavatmal District Bank Election
Third Front May Enter Yavatmal District Bank Election

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर आली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याची चर्चा असतानाच आता तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या लक्षात घेता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग अनेकांना धक्का देणारा असणार आहे.

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्राधिकरणाने जाहीर केला आहे. येत्या 26 मार्चला बॅंक संचालकांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अंतिम मतदारयादी आज शनिवार (ता. 15) प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्याची आर्थिक नाळ आपल्या ताब्यात राहावी, यासाठी शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन 'महाविकास आघाडी'च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शिवसेनेला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. 

एकीकडे असे चित्र असतानाच बॅंकेतील 'वजनदार' सहकार नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय तयार करण्याची खेळी सुरू केली आहे. यात विद्यमान आठ ते दहा संचालकांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरता येईल का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालकांच्या पदांसाठी निवडणूक होत आहे. अनेकांना "शेला नारळ' देण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. याची कुणकूण लागताच संचालक सक्रिय झाले आहे. नेत्यांना "धक्का'देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. सहकारात पक्षबांधीलकी नसते हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

जिल्हागटात दिग्गजांची लढत

तालुका गटात यावेळी स्पर्धा असली तरी सर्वाधिक स्पर्धा जिल्हा गटांसाठी असणार आहे. जिल्हा गटात केवळ दोन जागा आहेत. या दोन जागांवर आतापर्यंत तब्बल 24 जणांनी दावा केला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार, माजी मंत्री, उद्योजक, माजी नगराध्यक्ष असा एकापेक्षा एक जणांनी निवडणूक लढणार असल्याची इच्छा बोलून दाखविली आहे. यामुळे सर्वाधिक चुरशीची लढत यंदा जिल्हा गटात होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेची प्रवेशाची तयारी

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी संचालक आहेत. ते सहकारातील ज्येष्ठ नेते असून कॉंग्रेसच्या मुशीतच वाढलेले आहेत. यावेळी मात्र, शिवसेनेने बॅंक आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी काहींचा पत्ता कट करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागेवर 'कुबेर' प्रसन्न असलेल्यांची नावे संचालकपदासाठी चर्चेत ठेवली जात आहे. दिग्रसमधून माजी मंत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com