Thieves prosper in Aditya Thakare's rally | Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या रॅलीत चोरट्यांनी हात साफ केला 

मिलिंद तांबे  
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

वरळी पोलीस ठाण्यात विविध 13 तक्रारी दाखल झाल्या असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भव्य रॅली काढली. रॅलीतील गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरांनी हात साफ केल्याने अनेकांना हात चोळत बसावे लागले.

आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज भरत असल्याने शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरांनी अनेकांचे खिसे साफ केले. रॅलीमध्ये 7 चैन,1 मंगळसूत्र,4 पॉकेट आणि 3 मोबाईल लंपास करण्यात आले.

रॅलीतील भुरट्या चोरांचा फटका शिवसेनेच्या नेत्यांनाही बसला.मात्र आपल्या नियोजनावर संशय व्यक्त होऊन टीका होईल यामुळे अनेक नेत्यांनी गप्प राहणं पसंत केलं . मात्र रॅलीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारदारांची रांग लागली होती.

वरळी पोलीस ठाण्यात विविध 13 तक्रारी दाखल झाल्या असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख