कोरोना : सोनेचांदीपेक्षा किमती ठरली दारू, चोरट्यांनी फोडले बिअरबार 

गेल्या तीन दिवसांमध्ये सोनेचांदी, पैशांपेक्षा दारुची चोरी, दारुची वाहतूक पोलीसांनी पकडली. त्यामुळे सोनेचांदीपेक्षा किमती ठरली दारू, अशाच चर्चा झडू लागल्या आहेत. नंदनवनमधील खरबी येथील आनंद बिअर बार व सावनेरमधील गोविंद बिअर बार फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास केला
Thiefs Breaking Wine Shops in Lock Down Period
Thiefs Breaking Wine Shops in Lock Down Period

नागपूर : शहरात दारू बंदीमुळे मद्यपींचा जीव कासाविस होऊ लागला आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे बनावट दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. दारूच्या वाढत्या किमती आणि दारूबंदीमुळे चोरट्यांनी आपला मोर्चा सीलबंद असलेल्या बिअर बार आणि वाइन शॉपकडे वळवला आहे. चोरट्यांनी एकाच रात्री दोन बियरबार फोडून विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. 

याप्रकरणी एमआयडीसी आणि नंदनवन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये सोनेचांदी, पैशांपेक्षा दारुची चोरी, दारुची वाहतूक पोलीसांनी पकडली. त्यामुळे सोनेचांदीपेक्षा किमती ठरली दारू, अशाच चर्चा झडू लागल्या आहेत. नंदनवनमधील खरबी येथील आनंद बिअर बार व सावनेरमधील गोविंद बिअर बार फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास केला. काल पहाटे या दोन्ही घटना उघडकीस आल्या. उपराजधानीत जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, बिअर बार बंद आहेत. 

मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी आनंद बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटच्या दाराचे कुलूप तोडले. बारमधील दारुच्या बाटल्या चोरल्या. याचप्रमाणे सावनेर येथील गोविंद शेटे यांच्या मालकीच्या गोविंद बारचे शटर वाकवून चोरटे आत घुसले. बारमधील ४० हजार रुपयांचा मद्यसाठा चोरी केला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्याने एमआयडीसीतील देशी दारुचे दुकान फोडून दारुच्या ३३ पेट्या लंपास केल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com