भाजपच्या माजी महापौरांना कडाडून चावला चोरटा

Ex-Mayor-Ghadamode
Ex-Mayor-Ghadamode

औरंगाबाद : रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला शुक्रवारी (ता. 13) रात्री भाजपचे माजी महापौर भगवान घडमोडे यांनी धाडसाने पकडून दिले.

मात्र स्वतःची सुटका करून घेण्यासाठी चोरट्याने त्यांच्या बोटाचा चावा घेतल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात धाव घ्यावी लागली.

माजी महापौर भगवान घडमोडे शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिडको भागातील सारस्वत बॅंकेसमोरून आपल्या कारने जात होते.

यावेळी समोर धावपळ सुरू झाली. एकजण 'माझा मोबाईल चोरला, त्याला पकडा' असे ओरडत होता. श्री. घडमोडे यांनी हा आवाज ऐकताच गाडी उभी करून चोरट्याला पकडण्यासाठी धाव घेतली.

 पाठलाग करून त्यांनी चोरट्याला पकडलेही.  मात्र त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी चोरट्याने त्यांच्या बोटाला जोरात चावा घेतला. त्याचवेळी इतर नागरिकही श्री. घडमोडे यांच्या मदतीला धावून आले.

त्यांनी चोरट्याला पकडून चोप दिला. त्यानंतर सिडको पोलिसांना पाचारण करून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र या भुरट्या चोराचे नाव समजू शकले नाही. दरम्यान प्रचंड वेदना होत असल्यामुळे घडमोडे यांना तत्काळ रुग्णालय गाठावे लागले.

माजी महापौर भगवान घडामोडे म्हणाले, माझ्या समोरूनच चोरटा पळून जात होता. समोरचा व्यक्ती त्याच्या मागे पळत होता, हे बघून मी गाडीतून तातडीने उतरलो. माझ्या बोटाला चोरट्याने चावा घेतला असला तरी माझ्या तत्परतेमुळे एखद्याचा मोबाईल वाचला, याचे समाधान वाटले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com