`...यांचा काही नेम नाही; आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढून टाकतील`

`...यांचा काही नेम नाही; आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढून टाकतील`

लातूर : ``एका रात्रीत ३७० कलम काढून टाकले. त्याप्रमाणे आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढून टाकले जाऊ शकते. या सरकारचा काही नेम नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी येथे केली. आरक्षणाच्या बाबतीत मोहन भागवत यांनी नुकतेच जे विधान केले आहे. त्याचा अर्थ काय काढायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लातूरात आयोजित लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनात जितेंद्र आव्हाड बोलत होते. या वेळी आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, ‘‘आरक्षणाच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण, हे समाजाने ओळखायला हवे. आम्हाला आरक्षण मिळालेच पाहीजे, असे लिंगायत समाजाने सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगायला हवे; पण सरकारने अद्याप या समाजाचा प्रश्न सोडवला नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरच हा प्रश्न सुटणार आहे.’’

विक्रम काळे म्हणाले, सरकारने लिंगायत बांधवांबरोबरच धनगर आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण दिले नाही. धनगर समाजाला तर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षण देण्याचा निर्णय हे सरकार घेणार होते. अशा अनेक घोषणा या सरकारने केल्या; पण लोकांना दिलेला शब्द पाळला नाही. मुख्यमंत्री ३१ ऑगस्ट रोजी लातूरात येणार आहेत. त्याआधीच त्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा. तो घेतला नाही समाजबांधव येणाऱ्या निवडणूकीत नक्कीच वेगळा निर्णय घेतील. राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही या प्रश्न लगेच सोडवू.

कॉमा द्या नाहीतर ‘कोमा’त जाल
देशमुख म्हणाले, ‘‘वाणी नावाला असलेले आरक्षण लिंगायत व हिंदू लिंगायतांना लागू व्हावे. त्यासाठी शुद्धीपत्रक काढावे, एवढीच लिंगायत समाजाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची संधी महायुतीला मिळाली आहे. पण अद्याप या मागणीचा विचार झाला नाही. इशारा देण्यात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकत नाही. लिंगायत समाजाला आरक्षण द्या. नाहीतर युती होणार नाही, असा इशारा शिवसेनेने द्यायला हवा.’’ शुद्धीपत्रक काढताना सरकारला केवळ कॉमा (स्वल्पविराम) द्यायचा आहे. तो दिला नाहीतर जनता ‘कोमा’त घालवेल, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com