Thers is No Situation like 2014 Say Sanjay Raut | Sarkarnama

संजय राऊत म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत २०१४ सारखी स्थिती नाही

संपत देवगिरे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ सारखी स्थिती नाही. आम्ही गेली पाच वर्षे सरकार चालवले आहे. त्यादृष्टीने प्रचारातील मुद्दे देखील वेगळे आहेत. मात्र सत्तेवर भाजप, शिवसेनाच येईल असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. येथील एसएसके साॅलीटेअर हाॅटेलमध्ये निवडणूक विषयक वार्तालाप झाला. यावेळी त्यांनी माहिती दिली.

नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ सारखी स्थिती नाही. आम्ही गेली पाच वर्षे सरकार चालवले आहे. त्यादृष्टीने प्रचारातील मुद्दे देखील वेगळे आहेत. मात्र सत्तेवर भाजप, शिवसेनाच येईल असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. येथील एसएसके साॅलीटेअर हाॅटेलमध्ये निवडणूक विषयक वार्तालाप झाला. यावेळी त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, ''राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी हे प्रभावी व एकमेव नेते आहेत. विरोधक सांगतात आमच्याकडे पाच उमेदवार आहेत. यातच त्यांचा पराभव आहे. कारण जेव्हा एकापेक्षा अधिक उमेदवार असतात तेव्हा अगदी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठीही अडचणी येतात. मग पंतप्रधान कसा निवडणार? काय देवेगौडा यांना पाठिंबा देणार की ममता बॅनर्जी यांना समर्थन द्यायचे. तशी स्थिती नको आहे त्यामुळे आम्हाला सत्ता मिळेल,''

पंतप्रधान मोदी विकासाला बोलत नाहीत. त्याच्या प्रचाराचा रोख काश्मीर, सर्जीकल स्ट्राईक आणि शरद पवार, राहूल गांधी यांच्यावर वैयक्तिक टिका असाच असतो. यावर राऊत म्हणाले, ''त्यांनी पाच वर्षे विकास केला आहे तो जनतेला  माहित आहे. त्यामुळे या टीकेत तत्थ्य नाही. नरेंद्र मोदी हुकुमशहा, हिटलर आणि तत्सम आरोप विरोधक करतात. ते खरे असते तर मोदी यांनी ते ऐकले असते का?. त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आहे. देशात लोकशाही आहे. जेव्हा इंदिरा गांधी हुकुमशहा झाल्याचे जाणवले तेव्हा लोकांनी त्यांना पायउतार केले. पुढे पुन्हा सत्ता दिली,"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख