अकोला जिल्हा शिवसेनेत लवकरच खांदेपालट

..
अकोला जिल्हा शिवसेनेत लवकरच खांदेपालट

अकोला : शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख आमदार म्हणून निवडून आल्याने आता जिल्हा शिवसेनेच्या संघटनात्मक फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीसोबतच महानगर कार्यकारिणीतही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 


नव्याने नियुक्ती करताना विधानसभा निवडणूक काळात शिवसेने व मित्र पक्षांसाठी केलेल्या कामांची समीक्षा होणार असून, काम बघूनच पदे दिली जाणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात एकच मतदारसंघ मिळाला होता. बाळापूर मतदारसंघातून जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी विजय मिळविला.  त्यामुळे आता जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार आहे. जिल्हा प्रमुखांसह शहर प्रमुखांची खांदेपालट होणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.

जिल्हा प्रमुखांसह जिल्हा कार्यकारिणीतही मोठे फेरबदल होणार आहे. हे फेरबदल करताना विधानसभा निवडणूक काळात पक्षासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. ज्यांनी पक्षासाठी काम करण्याएेवजी अडचणी वाढविण्याचे काम केले त्यांच्याकडील पदं काढून घेतल्या जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

‘त्या’ बैठकांचाही होणार विचार
अकोला शहरातील दोन पैकी एक मतदारसंघ मिळावा म्हणून विधानसभा निवडणूक काळात झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचाही नव्याने कार्यकारिणी निवडताना विचार होणार आहे. शिवसेना पक्ष म्हणून निर्णय मान्य करण्याएेवजी बैठका घेवून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या तक्रारी शिवसेना संपर्क प्रमुख आणि पक्ष श्रेष्ठींकडे करण्यात आल्या असल्याने हे पाऊल उचण्यात येत असल्याची माहिती आहे.

युवासेनेतही बदल अपेक्षित
जिल्ह्यातील युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध काम केल्याची चर्चा आहे. या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. राज्यातील सरकार स्थापन होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. पदावरून पायउतार होण्याच्या दिशेने त्यांची उलटी गिणती सुरू झाली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com