शिरवळसह सातारा जिल्ह्यात नव्याने टोलनाका नको 

शिरवळसह सातारा जिल्ह्यात नव्याने टोलनाका नको 

खंडाळा (जि. सातारा) : शिरवळ व सातारा जिल्ह्यात कोठेही नव्याने टोलनाका उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. खेड शिवापूर येथील टोल हटावसंदर्भात सर्वपक्षीय झालेल्या आंदोलनामुळे आता हा टोलनाका शिरवळ येथे उभारणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे परदेश (स्वीडन) दौऱ्यावरून आल्यानंतर होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे. 

पुणे पीएमआरडी क्षेत्राबाहेर हा टोलनाका हलवावा, अशी प्रमुख मागणी असल्यामुळे लगत असलेल्या शिरवळला टोलनाका येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्री. कबुले यांनी शिरवळसह जिल्ह्यात कोठेही टोलनाका हा उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये सध्या ताथवडे व आनेवाडी येथे टोलानाके आहेत. हे टोलनाके उभे राहिल्यापासून सातत्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला आहे. आजही या टोलनाक्‍यांवर सुविधांचा अभाव आहे. अशी वस्तुस्थिती असताना शिरवळनजीक तिसरा टोलनाका होणार असल्याचे समजते. याबाबत खंडाळा तालुक्‍यात व महामार्गालगतच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे याठिकाणी टोलनाका उभारल्यास जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन अशांतता पसरणार आहे. तेव्हा भविष्यात शिरवळ व सातारा जिल्ह्यांमध्ये कोठेही टोलनाका उभारण्यास परवानगी देऊ नये. 

भरगुडे, तांबे, सुर्यवंशींचाही विरोध 

जिल्ह्यात सध्या दोन टोलनाके आहेत, तरीही टोलनाका उभारण्याचा प्रयत्न केल्यास आजवर कधीही न पाहिलेला खंडाळा शासनास अनुभवावा लागेल, अशा तीव्र भावना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. सभापती राजेंद्र तांबे, भाजप सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, इतर पदाधिकाऱ्यांनीही आंदोलन करायला लावू नये, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com