जीवनाला कलाटणी देणारे दोन प्रसंग आयुष्यात आले : ज्योतिरादित्य

जीवनाला कलाटणी देणारे दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आले. एक म्हणजे वडिलांना गमावले तो प्रसंग. दुसरा म्हणजे भाजप प्रवेश. या दोन्ही प्रसंगांनी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे, असे भावनिक उद्गार भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत पक्षप्रवेशावेळीकाढले.
There have been two life changing events for me says jyotiraditya
There have been two life changing events for me says jyotiraditya

पुणे - जीवनाला कलाटणी देणारे दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आले. एक म्हणजे वडिलांना गमावले तो प्रसंग. दुसरा म्हणजे भाजप प्रवेश. या दोन्ही प्रसंगांनी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे, असे भावनिक उद्गार भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत काढले. 

कॉंग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करून नवा रस्ता निवडला, असेही ज्योतिरादित्य म्हणाले. 

जनसेवेचे व्रत मी कॉंग्रेसमध्ये राहून पूर्ण करू शकत नव्हतो. पक्षातील सद्यस्थिती पाहता पूर्वीसारखा हा पक्ष राहिलेला नसल्याचे पूर्णपणे जाणवते असे ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे. 

या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com