मागच्या दाराने आरक्षण संपवण्याचे कारस्थान सुरू  : सुखदेव थोरात

प्राध्यापकांनी केवळ भावनिक प्रश्‍नावर एकत्र न येता लोकांपर्यंत जाऊन आरक्षणाची भूमिका मांडली पाहिजे.-सुखदेव थोरात
sukhdeo-Thorat
sukhdeo-Thorat

सांगली  : " देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बिकट असून यात प्राध्यापकांना संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल", असे मत पद्मश्री सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. 

फुले, आंबेडकर, शाहू टीचर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित "भारतीय संविधान : आरक्षण आणि सामाजिक न्याय' या विषयावर आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रा. गौतमीपुत्र कांबळे अध्यक्षस्थानी होते.

ते म्हणाले,"मागच्या दाराने आरक्षण संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. खासगीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी प्राध्यापकांनी केवळ भावनिक प्रश्‍नावर एकत्र न येता लोकांपर्यंत जाऊन आरक्षणाची भूमिका मांडली पाहिजे.''

प्रा. कांबळे म्हणाले,"संविधानाने दिलेले आरक्षण संविधानाच्या आधारेच मोडून काढले जात आहे. अत्याचाऱ्यांना धार्मिक पावित्र्याची जोड दिल्याने ते वाढतच आहेत. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.''

फास्टाचे सचिव डॉ. भरत नाईक यांनी प्रास्ताविक केले. विकास मिणचेकर यांनी सूत्रसंचालन केले.

दिवसभराच्या चर्चासत्रात विजय खरे, सुरेश हुलण्णावर, चंद्रकांत वाघमारे, डॉ. एस. जी. जाधव, शुभम सोनावणे, जयश्री कांबळे, सी. जे. भारसकळे, डॉ. अशोक बाबर यांनी मांडणी केली. प्रा. सुभाष दगडे, प्रा. राजू ढाले, एन. डी. बनसोडे, रत्नजित जाधव, प्रवीण चंदनशिवे, नितीन गायकवाड, राहुल कांबळे आदींनी संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com