मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती : शरद पवार

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली आहे.
SHARAD_PAWAR_UDDHAV_THAKARE
SHARAD_PAWAR_UDDHAV_THAKARE

मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, रिपाई (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आदी मित्रपक्षांची बैठक नेहरू सेंटर येथे शुक्रवारी झाली. बैठक संपत आल्यावर शरद पवार तेथून अन्यत्र निघाले असताना पत्रकारांनी त्यांना काही प्रश्‍न विचारले.

तेव्हा श्री. शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली आहे. अन्य काही विषयांवर तपशिलात चर्चा सुरू असून त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आपणा सर्वांना त्याबाबत माहिती दिली जाईल.

काही वेळाने उद्धव ठाकरेही नेहरू सेंटरमधून बाहेर पडले. त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि अन्य नेते होते. 

पत्रकारांशी बोलताना श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, प्रमुख तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रथमच एकत्र येऊन चर्चा केली आहे. बऱ्याच गोष्टींवर मार्ग काढला आहे. एकही मुद्दा अनुत्तरित ठेवायचा नाही असे आम्ही ठरवले आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. मात्र चर्चा चांगली व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com