... तर संबंधित अधिकारी जबाबदार : आ.बाबासाहेब पाटील

.
MLA-Babasaheb-Patil warns officers
MLA-Babasaheb-Patil warns officers

अहमदपूर :  लातूर - नांदेड रोडवरील खड्डे तात्काळ बुजवावीत अन्यथा खड्डयामुळे कोणती दुर्दैवी घटना घडली तर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील अशा आशयाचे पत्र आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रकल्प संचालकांना दिले आहे.


तुळजापूर - नांदेड हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वहातूक होत आहे.या राष्ट्रीय महामार्गाचा जवळपास साठ किलोमिटर अंतर अहमदपूर-चाकूर मतदार संघातून जातो. या रस्त्यावर जीव घेणारे खड्डे पडल्याने वहातूकीस मोठी अडचण होत आहे. 

रस्त्यावरून जाताना खड्डयामुळे होणारे गाडीचे नुकसान, लागणारा दुप्पट कालावधी,होणारा मणक्याचा त्रास यामुळे वहानचालकांचे आर्थिक,शारीरिक,मानसिक नुकसान होत असून या रस्त्यावर अपघात होऊन आज पर्यंत ब-याच लोकांना कायमचे अपंगत्व तर कांही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  


या रस्ता दुरूस्तीचे काम तात्काळ करावे.दुर्दैवाने कांही घटना घडली तर त्याला संबधित प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे पत्र प्रकल्प अधिका-यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com