... तर भाजपसह 31 नगरसेवक राजीनामा देतील:  किशनचंद तनवाणी

उपमहापौरांच्या राजीनामा नाट्यानंतर भाजपचे 23 व भाजपसोबत असलेले आठ अपक्ष नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यापूर्वी महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी अट भाजपने घातली आहे.
Kishanchand Tanwani.
Kishanchand Tanwani.

औरंगाबादः महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेच्या महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, त्यांनी राजीनामा दिला तर भाजपसह 31 नगरसेवकही आपल्या पदाचा राजीनामा देतील असा दावा भाजपचे शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केला.

महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार असली तरी डिसेंबरच्या थंडीतच शहरातील राजकारण तापले आहे. राज्यात युती संपुष्टात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत भाजपने शिवसेनेची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याची चाचपणी सुरू केली आहे. उपमहापौरांच्या राजीनामा नाट्यानंतर भाजपचे 23 व भाजपसोबत असलेले आठ अपक्ष नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यापूर्वी महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी अट भाजपने घातली आहे.

शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शुक्रवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना ही मागणी केली आहे.
महापालिकेचे बजेट डिसेंबर महिना सुरू झाली तरी अंतिम झालेले नाही. त्यामुळे महापौरांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. मात्र यासभेत बजेट ऐवजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण रंगले.

सभेला सुरवात होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवण्यात आला. मात्र शिवसेनेने अभद्र युती केल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेला डिवचले. त्याला सेनेकडूनही जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे महापालिकेचा अक्षरश आखाडा झाला होता.

या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला. उपमहापौरांच्या राजीमान्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी महापालिकेत दाखल झाले. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेला राजीनामा सभागृहात अचानक घडलेला प्रकार आहे. पक्षाने यासंदर्भात कुठलेही आदेश दिलेले नव्हते.

राजीनामा महापौरांकडे देणे गरजेचे होते. मात्र वरिष्ठ नगरसेवकांच्या हे लक्षात का आले नाही, हे त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच कळेल. आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर औताडे पुन्हा उपमहापौरांच्या खुर्चीत बसू शकतात असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान शिवसेना-भाजप युती आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजपच्या 23 नगरसेवकांसह सोबत असलेल्या आठ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. मात्र महापौर युतीचे असल्यामुळे आधी त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर आमचे नगरसेवक राजीनामा देतील, असे तनवाणी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com