..तर मुश्रीफ चंद्रकांतदादांचा सत्कार करणार

...
hasan mushrif-patil
hasan mushrif-patil

कोल्हापूर : शरद पवार यांच्यावर पीएच.डी. करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही चांगली बाब आहे. पवार यांचा मोठा व्यासंग आहे. ते दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्यावर भाजपचे नेते पीएच.डी.करणार असतील तर कौतुकास्पद बाब आहे. पीएच.डी. केल्यानंतर दादांचा सत्कार करू, असा टोमणा मुश्रीफ यांनी मारला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुसरे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार हे भव्य नेते असून दादांची पीएच.डी सात जन्म घेतले तरी पूर्ण होणार नाही, असे म्हटले होते. त्या तुलनेत मुश्रीफ यांनी दादांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

काय म्हणाले होते दादा...?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपाही देशावरची आपत्ती आहे असा केला होता. त्याबाबत विचारलं असता, “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण ते ५० वर्षे राजकारणात आहे तरीही त्यांचा पक्ष १० पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय? एकाचवेळी ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचे म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्याला उत्तर म्हणुन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com