theft of soil : HC takes cognizance | Sarkarnama

शेतातील मातीच चोरीला गेली : उच्च न्यायालयाने घेतली दखल

किरण भदे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नसरापूर : जांभळी (ता. भोर, जि. पुणे) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय 71) यांच्या शेतातील माती ही बंधारयाच्या कामासाठी चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करुन या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य शासनासह पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अशा ऩऊ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

शेतकरी सर्जेराव कोळपे यांच्या जांभळी येथील गट क्रमांक 233 मधील 19 गुंठे शेतजमिनी मधील चार फूट खोल खोदुन सुमारे 576 ब्रास माती तेथुन जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बंधारयाच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आली.

याबाबत संबधीत ठेकेदार व कामावरील अभियंता यांनी शेतकरयांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती अगर त्या मातीची तहसील कचेरीत राँयल्टी भरली नव्हती, यामुळे कोळपे यांना शेतात मातीच नसल्याने शेती करता आली नव्हती. शेतातील मातीची चोरी झाल्याची तक्रार सर्जेराव कोळपे यांनी सात मे 2018 पासुन गावकामगार तलाठ्यां पासुन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली. परंतु संबंधित यंत्रणेने अधिकारयांना पाठिशी घालत याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. राजगड (नसरापुर) पोलिसांनी देखिल कोळपे यांची तक्रार दाखल करुन घेतली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
 
याबाबत स्थानिक प्रशासनाकडून योग्य सहकार्य व न्याय मिळत नसल्याने कोळपे यांनी 11 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, सारंग कोतवाल यांनी दाखल करुन घेत राज्य शासनाला, गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांना सांगितले आहे.
 
याबाबत भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना अद्याप या प्रकरणाची नोटीस मिळाली नसल्याची त्यांनी माहिती दिली.

शेतकरी कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या शेतातील माती चोरीला गेल्याने मला यावर्षी शेतीच करता आली नाही मातीचोरीची तक्रार केली असता तहसीलदारांनीचला विनापरवाना उत्खनन केल्याबद्दल मलाच दंडाची नोटीस काढली. तर लघु पाटबंधारयाच्या अभियंत्यांनी ठेकेदाराचे नाव घेवुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अगोदर तक्रार दाखल करावयास नकार दिला व दाखल केल्यावर अधिकारयांवर कारवाई करता येणार नाही असे सांगितले. यातुन कोठेही न्याय मिळत नसल्याने शेवटी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला माझा न्याय संस्थेवर विश्वास असुन या ठिकाणी मला जरुर न्याय मिळेल असा विश्वास वाटतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख