ठाण्यात भाजप शिवसेनेला जागा दाखवून देईल : चोरघे

राज्यात सामान्यांच्या गरजा ओळखून भाजप पक्षाने विविध विकासकामे आणि योजना राबविण्याचे काम सुरू केले असतानाही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून भाजपवर टीकासत्र सुरू आहे. शिवसेना नेत्यांनी पक्षावर टीका करण्यापेक्षा लोकहिताची कामे करावीत; अन्यथा आगामी निवडणुकीत भाजप आणि मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा टोला भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी भिवंडीत झालेल्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष सभेत लगावला.
ठाण्यात भाजप शिवसेनेला जागा दाखवून देईल : चोरघे

भिवंडी : राज्यात सामान्यांच्या गरजा ओळखून भाजप पक्षाने विविध विकासकामे आणि योजना राबविण्याचे काम सुरू केले असतानाही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून भाजपवर टीकासत्र सुरू आहे. शिवसेना नेत्यांनी पक्षावर टीका करण्यापेक्षा लोकहिताची कामे करावीत; अन्यथा आगामी निवडणुकीत भाजप आणि मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा टोला भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी भिवंडीत झालेल्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष सभेत लगावला.
 
ठाणे जिल्ह्यात आगामी पदवीधर कोकण मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या भूमिकेतून जिल्हा कार्यकारिणीची विशेष बैठक भाजप जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे आणि ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत भिवंडी तालुक्‍यातील गोवे गाव येथील कार्यालयात गुरुवारी सकाळी झाली. या वेळी तालुका अध्यक्ष पी. के. म्हात्रे, दीपक केणे, जितेंद्र डाकी, रामनाथ पाटील, जयवंत सूर्यराव, सुनील सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिवसेनेचे पदाधिकारी सत्तेत असताना सरकारविरोधी भूमिका घेऊन विकासकामांना अडथळे निर्माण करत असल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत.

आगामी पदवीधर कोकण मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना युती करणार नाही. हे गुहीत धरून भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, असे सांगत चोरघे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे आवाहन केले. 

या वेळी कृष्णा रसाळ, महेंद्र पवार, जयराम भोईर, नितीन मोहपे यांच्यासह ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com