मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का;  जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये 

मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का;  जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये 

भाईंदर : मीरा भाईंदरच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांची गळती काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या निवडणुकीला माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या पासून सुरु झालेली ही गळत आजही सुरु आहे काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला. दुबोले हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 

मीरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे गिलबर्ट मेंडोसा आणि गणेश नाईक यांची काँग्रेस म्हणून ओळखली जात होती. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरु झाली त्यातून गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाईंदर मधील  राष्टवादी काँग्रेस टिकवण्याचा प्रयत्न केला होता. गिलबर्ट मेंडोसा यांच्या काळातील जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील यांनी भाजपची वाट पकडली तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी हाताचे घड्याळ कडून पंजा जवळ केला.

दरम्यानच्या काळात गणेश नाईक यांनी आपली पकड राखण्यासाठी इतर कोणाला जिल्हाध्यक्ष न करता आपले समर्थक प्रकाश दुबोले यांच्या कडेच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीमहापालिका निवडणुकीच्या वेळी संजीव नाईक यांनी भाजपला मदत होईल अश्या तर्हेने उमेदवार दिल्याचा आरोप करण्यात आला होता. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नाईक समर्थक सुद्धा भाजपच्या वाटेवर जाऊ लागल्याने मीरा भाईंदर मधील उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस ही संपणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com