प्रवीण चौगुलेची स्वामीनिष्ठा पाहून त्याला सलाम : डाॅ. जितेंद्र आव्हाड (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच ठाण्यातील मनसेच्या प्रवीण चौगुले या कार्यकर्त्याने या नोटिशीमुळे अस्वस्थ होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याबाबत आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रवीण चौगुलेची स्वामीनिष्ठा पाहून त्याला सलाम : डाॅ. जितेंद्र आव्हाड (व्हिडिओ)

ठाणे : ''राजकारणात आज बऱ्याच ठिकाणी निष्ठेची विष्टा होताना पाहायला मिळते आहे. चाळीस वर्ष सत्ता असतानाही आज लोक पक्ष सोडून जातात आणि दुसरीकडे प्रवीण चौगुलेसारखा कार्यकर्ता आत्महत्या करतो. ही निष्ठा पाहून प्रवीण चौगुलेला सलाम आणि असे कार्यकर्ते मिळालेले राज ठाकरे नशिबवान," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच ठाण्यातील मनसेच्या प्रवीण चौगुले या कार्यकर्त्याने या नोटिशीमुळे अस्वस्थ होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याबाबत आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

''आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून प्रवीण चौगुले सारखा मनसेचा कार्यकर्ता आत्महत्या करतो. आज त्याच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही घर नाही. केवळ आपल्या नेत्याला होत असलेल्या त्रासामुळे तो अस्वस्थ झाला.  प्रवीण चौगुले माझ्याच मतदारसंघातील कळवा येथील आहे. ही आत्महत्या दुर्दैवी आहे. मी आत्महत्येचे समर्थन करत नाही . मात्र, ही निष्ठा पाहून प्रवीण चौगुलेला सलाम. राज ठाकरेही नशीबवान आहेत. आजच्या राजकारणात अशा प्रकारची स्वामीनिष्ठा लाभते हे आतापर्यंतच्या  मी पाहिले नव्हते. प्रवीण चौगुलेने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे ," असेही आव्हाड म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com