ठाणे राष्ट्रवादीकडून पूरग्रस्त मायभगिनींना 'माहेरचं लेणं'

ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखवलेली ही दातृत्वाची भावना कौतुकास्पद आहे. मायभगिनींचे संसार उभे करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत महत्त्वाची असून माणुसकी जिवंत असल्याचे आव्हाड, परांजपे आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले आहे.-सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी
Thane NCP- send help for flood affected women
Thane NCP- send help for flood affected women

ठाणे :  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ओढवलेल्या भीषण पूरस्थितीमध्ये आपला संसार गमावलेल्या आया-बहिणींना संसार उभा करण्यासाठी हातभार लावणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता 'संघर्ष' संस्था आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी लागणारे साहित्य दोन ट्रक भरून पाठवले.

 या ट्रक्‍सना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, समाजसेविका ता आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई उपस्थित होते.

गेल्या आठवड्यामध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू पाठवल्या होत्या. मात्र, या पूरग्रस्तांचे संसार वाहून गेल्यामुळे त्यांचा संसार उभे करण्याचे मोठे आव्हान होते. हे ध्यानात आल्यामुळे आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परांजपे यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या गृहपयोगी वस्तू जमा केल्या. 

तेथील महिलांना माहेरची माया देणे गरजेचे असल्यानेच भांडी, गृहपयोगी वस्तू पूरग्रस्त भागामध्ये पाठवल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी, आव्हाड आणि ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कौतूक केले. 

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील. नगरसेविका राधाबाई जाधवर, अंकिता शिंदे, अपर्णा साळवी, प्रमिला केणी, आरती गायकवाड, वर्षा मोरे, अनिता किणे, सुनिता सातपुते, रुपाली गोटे, हफिजा नाईक, आशरीन राऊत, सुलोचना पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखवलेली ही दातृत्वाची भावना कौतुकास्पद आहे. मायभगिनींचे संसार उभे करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत महत्त्वाची असून माणुसकी जिवंत असल्याचे आव्हाड, परांजपे आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले आहे.
-सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com