ठाण्यात  मनसेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी मैदानात

आंब्यावरून वातावरण गरम झाले आहे. काल जे घडले ते ठाणे शहरात प्रथमच घडले असून गेली 25 वर्षे ठाणे पालिकेत शिवसेनेच्या साथीने सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीत पालिका प्रशासनानेही या शेतकऱ्यांवर कारवाई करणे सर्वार्थाने चुकीचेच आहे. ठाण्यात येऊन आपला शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
Thane-MNS-NCP.
Thane-MNS-NCP.

ठाणे :  भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे; गोरगरीब शेतकरी आपले शेतकी उत्पादन विकण्यासाठी ठाण्यात येत असतील, तर त्यांना हुसकावून लावण्याचे राजकारण करू नये; असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे. वेळप्रसंगी आंदोलन म्हणून महापालिकेच्या दारात आंबे विक्री करू असा इशारा दिला आहे.

पदपथावरील आंबा विक्रीवरून सुरू झालेल्या वादात राष्ट्रवादीने मनसेच्या बाजूने उडी घेतली आहे.ठाण्यातील विष्णूनगर येथील फुटपाथवर मनसेच्या पुढाकाराने लावलेला आंबे विक्रीचा स्टॉल हटविण्यासाठी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी गुरुवारी (ता.9) सायंकाळी प्रयत्न केला होता. त्याचवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी हा स्टॉल वाचविण्यासाठी पुढे आले होते. शहरात पदपथ इतर फेरीवाल्यांनी व्यापलेले असताना मराठी माणसाच्या व्यवसायावरच कारवाई का, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला. पण हा वाद वाढत जाऊन मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण पोचले होते. त्यानंतर अखेर पोलिसांना बळाचा वापर करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटवावे लागले होते.

अद्याप हा वाद शमलेला नसून मराठी व्यापारी याच ठिकाणी आपला व्यवसाय करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसेच पुन्हा येथे आंबा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे हा वाद आता अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेच्या बाजूने उडी घेतली आहे. या संदर्भात शुक्रवारी आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com