ठाण्यात सभा घेणारच : मनसे

फेरीवाला प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेच्या जागेवरून वाद सुरू असला, तरी ठाणे पश्‍चिमेला रेल्वे स्थानकाजवळ किंवा तलावपाळी मार्गावर मनसेला सभा घ्यायची आहे. मात्र, रस्त्यावरील सभेला परवानगी न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असताना "आम्ही सभा घेणारच', असा इशारा मनसेने दिला आहे.
ठाण्यात सभा घेणारच : मनसे

मुंबई : फेरीवाला प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेच्या जागेवरून वाद सुरू असला, तरी ठाणे पश्‍चिमेला रेल्वे स्थानकाजवळ किंवा तलावपाळी मार्गावर मनसेला सभा घ्यायची आहे. मात्र, रस्त्यावरील सभेला परवानगी न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असताना "आम्ही सभा घेणारच', असा इशारा मनसेने दिला आहे.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी विविध प्रकारे अडथळे आणले जात आहेत. जिथे एरवी इतर पक्षांच्या सभांना परवानगी दिली जाते, तिथे मनसेलाच आडकाठी का, असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर उपस्थित केला आहे.

आमच्या लढ्यामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत? माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे? एकीकडे सरकारविरोधी कुणी बोलले तर त्यावर सत्तेचा बडगा आणला जातो. पण; सरकारनेही हे समजून घ्यावे की ज्या लोकशाहीचे उठता बसता तुम्ही "संदर्भ' देता त्याच लोकशाहीत भूमिका मांडणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतोय. मग ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली नाही का, असा प्रश्‍नही मनसेने उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com