ठाण्यातील बोगस डाॅक्टरांविरुद्ध कारवाईसाठी समिती; महापौरांचे आदेश

शहरातील बोगस डॉक्‍टरांविरुद्ध तक्रारी येत आहेत. जिल्हास्तरावरून बोगस डॉक्‍टरांच्या विरोधात वारंवार मोहीम आखली जात असते. पण त्यानंतरही शहरातील अनेक गल्लीबोळात बोगस डॉक्‍टर कार्यरत असल्याच्या तक्रारी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे आलेल्या आहेत
Thane Mayor Naresh Mhaske To Appoint Committee to Find Bogus Doctors
Thane Mayor Naresh Mhaske To Appoint Committee to Find Bogus Doctors

ठाणे : शहरातील बोगस डॉक्‍टरांविरुद्ध तक्रारी येत आहेत. जिल्हास्तरावरून बोगस डॉक्‍टरांच्या विरोधात वारंवार मोहीम आखली जात असते. पण त्यानंतरही शहरातील अनेक गल्लीबोळात बोगस डॉक्‍टर कार्यरत असल्याच्या तक्रारी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे आलेल्या आहेत. त्याची दखल घेऊन या विषयावर त्वरीत समिती नेमून या बोगस डॉक्‍टरावर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

या तक्रारींबाबत आज नरेश म्हस्के यांनी महापौर दालनात तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात ठाण मांडलेल्या बोगस डॉक्‍टरांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करुन तातडीने कारवाई करावी असे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले. ठाणे महापालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्‍टरांच्या बेपर्वाईमुळे रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. अशाच प्रकारचा रुग्ण दिव्यामध्येही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावल्याचे माहिती महापौरांना देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांचा सर्व्हे करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश महापौरांनी वैद्यकीय आरोग्य् अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर यांना दिले.

ठाण्यामध्ये बहुतांश झोपडपट्टी विभाग असून या ठिकाणी राहणारी जनता आर्थिक दुर्बल घटकातील असते. येथील नागरिक किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्या विभागात असलेल्या डॉक्‍टरांकडे जातात, परंतु सदर डॉक्‍टर हे प्रशिक्षीत आहेत की नाही याबाबत त्यांना ज्ञान नसते, त्यामुळे रुग्णावर चुकीचा उपचार होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेला ते जीवावरही बेतते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात दवाखाना सुरू करावयाचा असल्यास महापालिकेच्या संबंधीत विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक असते. परंतु महापालिका हद्दीतील विशिष्ट झोपडपट्टी विभागातील सर्व दवाखान्यांची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात यावी असे आदेश महापौरांनी दिले.

ही समिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक राजेंद्र अहिवर यांच्या अध्‌यक्षतेखाली नेमावी, यात वैद्यकीय अधिकारी, पोलीस उपायुक्त, छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या अधिष्ठाता, विधी सल्लागार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनीधी असतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले. बोगस डॉक्‍टरांमुळे जर नागरिकांचे जीव जाणार असतील तर ते कदापि सहन करणार नाही, त्यामुळे महापालिकेने तातडीने पावले उचलून समिती नेमून कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com