ठाण्यातील नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 7 चे कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी त्यांच्या एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2015 या कार्यकाळामध्ये उत्पन्नापेक्षा 136.27 टक्के बेहिशेबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 7 चे कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी त्यांच्या एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2015 या कार्यकाळामध्ये उत्पन्नापेक्षा 136.27 टक्के बेहिशेबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विक्रांत चव्हाण यांना मदत केल्याप्रकरणी पत्नी अरूणा चव्हाण, सासरे रविंद्रन नायर, सासू शांता नायर, कार्यकर्ते उमेश कांबळे, संतोष गावडे, प्रकाश भोसले, भास्कर गडामी, अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित व कल्पतरू प्राॅपर्टीजचे व्हाईस प्रेसिडेंट संजय डांगे यांच्या विरोधातही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  

बांधकाम व्यवसायिक सुरज परमार यांला धमकावून आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे. नगरसेवकपदाच्या कार्यकाळामध्ये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी ठाणे पोलीसांकडून त्यांच्या कार्यालय आणि घरांवर छापे टाकण्यात आले. 

या प्रकरणी वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या नेतृत्वाखाली विक्रांत चव्हाण यांच्या मालमत्तांसदर्भात दहा ठिकाणी झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पैशांचा अपहार, फसवणुक सारखे गुन्हेही नोंदवण्यात आले. 

या प्रकरणी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पोलीस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते, पोलीस निरीक्षक संजय साबळे आणि कर्मचारी तपास करत असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com