thakre government canceled appointment on milk corporation | Sarkarnama

भाजप कार्यकर्त्यांच्या दूध संघांवरील नियुक्‍त्या रद्द 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

.....

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघांवर केलेल्या 26 कार्यकर्त्यांच्या केलेल्या नियुक्‍त्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. 

 

महानंद, गोकुळ, बारामती, पुणे जिल्हा, कोयना, राजारामबापू पाटील आदी बलाढ्या दूध संघांवरील या नियुक्‍त्या होत्या. मागील पाच वर्षांच्या कालावधीत फडणवीस सरकारने अनेक सहकारी संस्थांवर भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या केल्या होत्या. गेले काही दिवस या नियुक्‍त्या रद्द करण्याचा सपाटा ठाकरे सरकारने लावला आहे. राजकीय सोईसाठीच या नियुक्‍त्या केल्या जातात. त्यामुळे सत्ताबदलल्यानंतर या नियुक्‍त्या रद्द करण्यात येत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख