उध्दव ठाकरे यांच्या सोबत सेल्फी आणि स्वागतासाठी औरंगाबादमध्ये झुंबड ...

.....
 उध्दव ठाकरे यांच्या सोबत सेल्फी आणि स्वागतासाठी औरंगाबादमध्ये झुंबड ...

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आता राज्याचे मुख्यमंत्री असलेले उध्दव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच औरंगाबादेत आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी या शहराचा माझे आवडते शहर म्हणून करायचे. त्यामुळे साहाजिकच उध्दव ठाकरे यांचे देखील औरंगाबादवर विशेष प्रेम आहे. गेली 30 वर्षे येथील सर्वसामान्यांनी शिवसेनेला भरभरून दिले. 

ठाकरे परिवाराबद्दल येथील शिवसैनिकांमध्ये प्रचंड आस्था आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे शहरात आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सोबत एक सेल्फी काढण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर एकच झुंबड उडाली होती. एरवी उध्दव ठाकरे औरंगाबादेत येतात तेव्हा स्थानिक नेते आणि मोजके पदाधिकारी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी यायचे. आज मात्र विमानतळ परिसर गर्दीने फुलून गेला होता. मुख्यमंत्री पदासाठीचा कडेकोट बंदोबस्त, गाड्यांचा ताफा, नेत्यांची रेलचेल आणि या सगळ्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आणि सर्वसामान्य शिवसैनिकांमधील अभूतपूर्व उत्साह आज पहिल्यांदा अनुभवायला मिळाला. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पहिल्यांदाच शहरात आल्यामुळे त्यांना शासकीय प्रथेप्रमाणे गॉर्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या पक्षाच्या सर्वोच नेत्याचा हा सन्मान आणि रुबाब पाहून अनेक वर्षापासून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांचे उर निश्‍चितच भरून आले. एरवीपेक्षा उध्दव ठाकरेंच्या स्वागतासाठी झालेली गर्दी ही चारपटीने वाढली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात देखील मिळेल तशी संधी साधत शिवसैनिक सेल्फीमध्ये आपल्या सोबत मुख्यमंत्री दिसतील यासाठी धडपडत होते. विमानतळा बाहेर पडतांना डाव्या बाजूने सकाळी दहा वाजेपासून हातात पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या शिवसैनिकांना उध्दव ठाकरे यांनी हात जोडून जेव्हा अभिवादन केले तेव्हा त्यांच्या आंनदाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा जयघोष करत शिवसैनिकांनी आपल्या नेत्याचे स्वागत केले. हे प्रेम पाहून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील भारावून गेले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com