मी नुसतं फीत कापायला आलो नाही, तर तुमचे प्रश्‍नही सोडवीन - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मी नुसतं फीत कापायला आलो नाही, तर तुमचे प्रश्‍नही सोडवीन - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

जागतिक आर्थिक मंदीमुळे देशातही मंदीचे वातावरण आहे. पण त्या विरोधात लढलं पाहिजे, रडत बसणे योग्य नाही असे सांगतांनाच ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या विषयाला देखील हात घातला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे, पण त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्तही केलं पाहिजे. स्वागताला लाल गालिचे असतात पण त्याखाली अडचणीचे काटे असतात, त्यातून मार्ग काढत कोंडी फोडली पाहिजे. या प्रदर्शनात सगळं आहे, शेती, एलईडी लाईट, फूड प्रोसेसिंग सगळं आहे. कृषी आणि उद्योग या दोन खात्यांच्या संगनमताने आपल्याला काही करता येईल का याचा मी प्रयत्न करतो आहे.

औरंगाबाद : नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवता येईल असे केंद्र तुम्हाला मी उभारून देईन. केवळ फीत कापायला नाही, तर तुमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या अडचणी दूर केल्या तरच तुम्ही मोठी झेप घेऊ शकाल. तुमच्या उद्योगांची जबाबदारी मी घेतो, तुम्ही माझ्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी घ्या असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्योजकांना केले. 

औरंगाबाद येथील कलाग्राममध्ये आयोजित "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र' या महाएक्‍स्पोचे उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री संजय बनसोडे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांशी संवाद साधतांनाच त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. ठाकरे म्हणाले, उद्योगांच्या वाढीसाठी सरकार कायम कटीबद्ध राहील. उद्योगांची जबाबदारी राज्याचा प्रमुख म्हणून मी घेतो, पण इथल्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या तरच बेरोजगारी कमी होऊन राज्याचा विकासही होईल. 

आजपर्यंत इच्छा असूनही अधिकार आणि ते वापरण्याचे अधिकार आपल्याकडे नव्हते. पण आता महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने मिळाले आहेत. आधी आम्ही उद्योजकांना पूर्वीचे सरकार वाईट होते असे सांगायचो, पण आता तसे सांगता येणार नाही. आम्हाला काम करुन दाखवावं लागेल, संकटावर मात करावी लागेल असे सांगतानाच माझे आजोबा सांगायचे संकटांच्या छाताडावर चालून जा, ते जमलं पाहिजे, अशी आठवण देखील उध्दव ठाकरे यांनी सांगितली. 

मंदीमध्ये रडत बसणे अयोग्य 
जागतिक आर्थिक मंदीमुळे देशातही मंदीचे वातावरण आहे. पण त्या विरोधात लढलं पाहिजे, रडत बसणे योग्य नाही असे सांगतांनाच ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या विषयाला देखील हात घातला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे, पण त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्तही केलं पाहिजे. स्वागताला लाल गालिचे असतात पण त्याखाली अडचणीचे काटे असतात, त्यातून मार्ग काढत कोंडी फोडली पाहिजे. या प्रदर्शनात सगळं आहे, शेती, एलईडी लाईट, फूड प्रोसेसिंग सगळं आहे. कृषी आणि उद्योग या दोन खात्यांच्या संगनमताने आपल्याला काही करता येईल का याचा मी प्रयत्न करतो आहे. कृषी आणि उद्योगांची मी सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे असेही उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

मेक इन इंडियाचं स्वप्न आपल्याला पडलं पाहिजे. बुद्धिमतेचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ आपण जिंकू शकतो. तुमच्या अडीअडचणी मला कागदावर लिहून दिल्या, तशी उद्योजकांची यादी आपल्याला द्या, जेणेकरून त्यांना कुठल्या माध्यमातून मदत करु शकतो ते पाहता येईल असे आश्‍वासन देखील ठाकरेंनी उद्योजकांना दिले. एलईडी स्टॉलला भेट दिल्याचा संदर्भ देत" स्टॉलवर नको तर काळोख असलेल्या घरात उजेड करण्यासाठी मला एलईडी दिवे हवे आहेत' असे आवाहन देखील ठाकरेंनी आपल्या खास शैलीत केले. 
बिडकीनला फुडपार्क उभारणार 
शेंद्रा-बिडकीन येथील 500 एकरवर अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र उभारणार असल्याची घोषणा देखील उध्दव ठाकरे यांनी या प्रदर्शनात केली. पाचशे पैकी शंभर एकर जमीन महिला उद्योगांसाठी राखीव असावी अशी माझी इच्छा आहे. भूमीपूजनाच्या पाट्या जागोजागी दिसत असतील, पण तसं आपल्याकडे होणार नाही. तर प्रत्यक्ष उद्योग उभे राहतील असा शब्द देखील उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com