महाविकास आघाडी पाच वर्षाची मॅच जिंकणार : उद्धव ठाकरे

विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक शिवसेनेच्या दालनात सकाळी नऊ वाजता सुरू झाली. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीला एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
  महाविकास आघाडी पाच वर्षाची मॅच जिंकणार : उद्धव ठाकरे

नागपूर : हिंदुत्व तसेच शेतकऱ्यांच्या विषयावर हिवाळी अधिवेशनात विरोधक वरचढ होऊ पाहत आहेत. त्यांना असे वाटते, की सरकारमध्ये तीन विचारसरणींचे पक्ष आहेत. परंतु, हा प्रयोग नवीन आहे. जनता याचे स्वागत करीत आहे. माझ्या "टीम'मध्ये सर्वच दिग्गज आहेत. यामुळे पुढील पाच वर्षे महाराष्ट्राचा विकास करून महाविकास आघाडी ही मॅच जिंकणार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. 

विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक शिवसेनेच्या दालनात सकाळी नऊ वाजता सुरू झाली. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीला एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर भर द्यावा, अशा सूचना या वेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणाले, ""आज देशात अशांतता निर्माण केली जात आहे. जनतेला चिंतेत ठेवायचे, अस्वस्थ वातावरण निर्माण करण्यासाठी ठिणग्या टाकण्याचे काम होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कसे उत्तर द्यायचे, हे मला चांगले ठाऊक आहे, ते मला शिकवण्याची गरज नाही.'' 

विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न होतील; परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांनी याला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमानुसार चालणार आहे. हे सरकार पाच नव्हे, तर अनेक वर्षे चालेल; फक्त जनतेच्या भल्यासाठी वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवावे, असे या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com