बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करणार - उद्धव ठाकरे

प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्‍चित करण्याचे धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करणार - उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ते धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी मराठवाडा वॉडर ग्रीड हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे; परंतु हे करीत असताना कृषी व्यवसाय व पिण्याचे पाणी यांचा समतोल राखला जावा. मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणांना जोडणाऱ्या प्रकल्पामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल. प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्‍चित करण्याचे धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. भूगर्भातील पाणी साठवण ठेवणाऱ्या जलधरांची निश्‍चिती करून विविध जल पुनर्भरण योजना राबविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे उद्‌भव पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन योजनांचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही ठाकरे यांनी या वेळी दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com