thakare and state election | Sarkarnama

आधी विरोधकांना मार्गी लावा, मग तुमचे प्रश्‍न मार्गी लागतील - उध्दव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : गेल्यावेळी आपण भांडत बसलो आणि तुमच्या बोडक्‍यावर दुसराच येऊन बसला. तुमचे सगळे प्रश्‍न मार्गी लागले का ? कामे झाली का ? असा सवाल उपस्थित करतांनाच आधी विरोधकांना मार्गी लावा, मग तुमचे प्रश्‍न मार्गी लागतील असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वैजापूर येथील जाहीर सभेत उपस्थितांना केले. एका पक्षात अनेकांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे खरेतर हे आपलं वैभव आहे, पण ज्यांनी भगव्यासाठी आपल्या इच्छा बाजूला ठेवल्या त्यांना मी धन्यवाद देतो असेही ठाकरे म्हणाले. 

शिवसेना भाजप महायुतीचे प्रा. रमेश बोरणारे यांच्या प्रचारार्थ वैजापूरमध्ये दुपारी उध्दव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गेल्या निवडणुकीत वैजापूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून दिल्याची आठवण करून देत तुमची कामे झाली का ? असा टोला देखील लगावला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते खाऊन खाऊन थकले, पण शरद पवार अजूनही म्हणतात मी थकलो नाही, त्यांना म्हणाव अजून खा, पण लोक डर्बीमध्ये थकलेल्या घोड्यावर पैसे लावत नसतात हे त्यांनी लक्षात ठेवावे अशी टिकाही केली. 

उध्दव ठाकरे म्हणाले, भाजपशी आम्ही युती केली ती तुमची कामे करण्यासाठी, सत्तेला हपापलो म्हणून नाही, मलिदा खायचा म्हणून नाही, तर तुम्हाला काही तरी द्यायचं म्हणून. जर युती केली नसती तर काय झाले असते ? गेल्यावेळी तुमच्या वैजापूरमध्ये काय झाले, दुसरा बोडक्‍यावर बसला ना ? नांदूर मधमेश्‍वर प्रकल्पाचे काम आघाडी सरकारच्या काळात का रखडले? हा प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेच्या वाणींनी प्रयत्न केला, आंदोलने केली. आता पुन्हा ती चूक करू नका. वैजापूरच्या एमआयडीसीचा प्रश्‍न आहे, तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा विषय आहेच. पण गरीबाच्या पोटाला अन्न मिळावे म्हणून दहा रुपयात थाळी हा उपक्रम शिवसेना राज्यात राबवणारच. एक रुपयांत आरोग्य चाचणी आणि राज्यातील पंधरा लाख विद्यार्थ्यांना किमान एक वर्ष शिष्यवृत्ती देण्याचा आमचा मानस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख