ठाकरे सरकार घेणार शरद पवारांकडून ऊसशेतीचे धडे...

ठाकरे सरकार घेणार शरद पवारांकडून ऊसशेतीचे धडे...

पुणे : ठाकरे घराण्याला शेतीतले काय कळत नाही असा सातत्याने होणारा आरोप पुसून काढण्यासाठी ठाकरे सरकार आता ऊसाच्या शिवारात रमणार आहेत. ऊस संशोधनासाठी देशात अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हिएसआय) 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 25 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्हिएसआयमध्ये मुख्यमंत्री ठाकरे बहुदा प्रथमच येत असून, यानिमित्ताने ते व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ऊस शेतीचे धड्याबरोबरच साखर कारखानदारांच्या समस्या जाणून घेणार आहेत. 

वसंतदादा साखर संस्था ऊस संशोधनात देशात अग्रेसर आहे. " संशोधनेन संवृद्धी' या ब्रीदवाक्‍याद्वारे संस्थेने ऊस संशोधनात मोठी क्रांती करत, शेती आणि शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणली आहे. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये होत असते. या पूर्वीच्या सर्व सभा साखर उद्योगांशी निगडीत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्या आहेत. यंदाची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काहीसी वेगळी असणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच व्हीएसआयमध्ये येणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे ऊस शेती, संशोधनाची माहिती घेणार आहेत. हि माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार देणार आहेत. या निमित्ताने ठाकरे ऊस शेती, साखऱ उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेणार आहेत. 

या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस शेती, साखर उद्योगात उल्लेखनिय कार्य केलेल्या शेतकरी, कारखाने, तंत्रज्ञ, संशोधकांना विविध पुरस्काराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला कृषी आणि सहकार क्षेत्रासह विविध खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे ऊस शेती आणि साखऱ कारखानदारीवर काय बोलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com