thakare and harshwardhan jadhav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मलबार हिल मतदार संघात भाजप चे मंगल प्रभात लोढा आघाडीवर
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

ज्यांना तळाहाताच्या फोडासारखे जपले तो ठसठसला आणि फुटला - उध्दव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत भगव्याशी केलेली गद्दारी आम्ही कदापी सहन करणार नाही, त्यांना गाडणारच अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना गर्भित इशारा दिला. 

कन्नड : हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केली तेव्हा आम्ही त्यांना मदत केली, तळ हाताच्याफोडाप्रमाणे जपले. पण नंतर मात्र हा फोड ठसठसला आणि फुटला, ते ही आम्ही सहन केले, मात्र लोकसभा निवडणुकीत भगव्याशी केलेली गद्दारी आम्ही कदापी सहन करणार नाही, त्यांना गाडणारच अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना गर्भित इशारा दिला. 

कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ कन्नड येथे सांयकाळी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. लोकसभा निवडणुकीत ज्या हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला, त्या जाधव यांचा उध्दव ठाकरे कसा समाचार घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर तोफ डागली. 

ठाकरे म्हणाले, ज्यांनी औरंगाबादवरचा भगवा झेंडा खाली उतरवला, त्यांना आम्ही सोडणार नाही. पोलिसांनी बेदम मारहाण केली तेव्हा शिवसेना जाधव यांच्या मदतीला धावून आली होती. तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही त्यांना जपले. हा फोडच पुढे ठसठसाला लागला आणि फुटला. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, सहनही केले. पण भगव्याशी केलेली गद्दारी शिवसेना कधीच विसरू शकत नाही, अशा गद्दारांना या निवडणुकीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 

थकलेल्यांना जनता किती सांभाळणार? 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील उध्दव ठाकरे यांनी तोंडसुख घेतले. ते म्हणाले, कॉंग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता थकली असल्याची जाहीर कबुली दिली आहे. तुम्ही कशामुळे थकलात, तर खाऊन खाऊन, आता तुम्हाला जनता किती काळ सांभाळणार. कॉंग्रेस महाआघाडीत त्राण राहिलेला नाही, आम्हाला विरोधकच नसल्याने आता त्यांच्याबद्दल आपण अधिक बोलणार नाही असा टोला देखील उध्दव ठाकरे यांनी सभेत लगावला. याशिवाय औरंगाबादचे नामांतर, राम मंदिर, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, वार्षिक दहा हजारांची मदत, दहा रुपयांत गरीबांना सकस आहार, सुशिक्षित बेरोजगांना शिष्यवृत्ती देण्याचे आश्‍वासन देखील उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख