पीक विमा मदत केंद्राला शनिवारी उध्दव ठाकरे भेट देणार

पीक विमा मदत केंद्राला शनिवारी उध्दव ठाकरे भेट देणार

औरंगाबाद : पीक विमा कंपन्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक गावात पीक विमा मदत केंद्र उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार राज्याच्या अनेक भागात शिवसेनेच्या वतीने पीक मदत विमा केंद्र उभारून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जात आहेत. शिवसेनेच्या या महत्वाकांक्षी कामाची पाहणी करण्यासाठी उध्दव ठाकरे शनिवारी (ता. 22) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन, मार्केट कमिटी येथील शिवसेना पीक विमा मदत केंद्राला भेट देऊन ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील गलथानपणा चव्हाट्यावर आणल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा आता पंतप्रधान पीक विमा योजनेकडे वळवला आहे. केवळ राज्यातीलच नाही तर देशभरातील लाखो शेतकऱ्यांना पीक विमा भरून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करत खाजगी विमा कंपन्या आपल उखळ पांढर करून घेत आहेत. 

गेल्या आठवड्या उध्दव ठाकरे जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी चारा छावणीच्या भेटीत पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तेव्हा पीक विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असा इशारा दिला होता. औरंगाबाद शहरात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पीक विमा मदत केंद्र सुरू केल्यांनतर संपुर्ण जिल्ह्यात ती सुरू होत आहेत. 

पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेनेने या मदत केंद्रांच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. मुंबई शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन सोहळ्यातील चर्चा सत्रामध्ये देखील पीक विमा हा प्रमुख विषय होता. पीक विमा मदत केंद्र सुरू केल्यानंतर तिथे कशा प्रकारे काम सुरू आहे हे पाहणी करण्यासाठी उध्दव ठाकरे शनिवारी सकाळी नऊ वाजता लासूर स्टेशन येथील केंद्राला भेट देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत पीकविम्या संदर्भात त्यांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com