तोल सांभाळणे महत्वाचे, जे आपटायचे ते आपटलेच आहेत : उद्धव ठाकरे

राज्यात दरवर्षी 12 हजार नागरिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान मर्यादित काळासाठी न राबवता संपूर्ण वर्षभर राबवले पाहिजे. त्याद्वारे अपघातांचे प्रमाण 10 टक्के तरी कमी करता येईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
तोल सांभाळणे महत्वाचे, जे आपटायचे ते आपटलेच आहेत : उद्धव ठाकरे

मुंबई : ""मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, सध्या तीनचाकी कार नाही, तरी सरकार चालवतो. त्यात रहदारीचे नियम पाळतो. महाआघाडीवर तीनचाकी सरकार म्हणून टीका झाली; मात्र ते चालतेय हे महत्त्वाचे'', असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विरोधकांना दिले. ""दोनचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी असो, तोल सांभाळला पाहिजे; जे आपटायचे ते आपटलेच आहे'', असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

नरिमन पॉइंट येथील जमशेद भाभा थिएटर येथे 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन झाले. दोनचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी वाहन असो; त्या वाहनाचे नियंत्रण करणारा चालक महत्त्वाचा असतो. त्यामुळे चालकाला हे नियम शिकवणे अत्यावश्‍यक असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील अपघात कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

2005 मध्ये प्राणांतिक अपघातांचे प्रमाण चीनमध्ये 94 हजार आणि भारतात 98 हजार होते. आता हे प्रमाण चीनमध्ये 45 हजारांपर्यंत कमी झाले असून, भारतात मात्र मृत्युदर दीड लाखावर आहे, असे ते म्हणाले. राज्यातील अपघातांची संख्या कमी करा. रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर दक्ष राहा. शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, सुरक्षित महाराष्ट्र घडवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

राज्यात दरवर्षी 12 हजार नागरिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान मर्यादित काळासाठी न राबवता संपूर्ण वर्षभर राबवले पाहिजे. त्याद्वारे अपघातांचे प्रमाण 10 टक्के तरी कमी करता येईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. 

नगरविकास विभागाने विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाशी चर्चा करावी. या पद्धतीने विकास आराखडा तयार केल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद करावी असे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सुचविले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com