thakare and bjp leader | Sarkarnama

मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, आम्ही खोटारडेपणा केलेला नाही, शिवसेनाप्रमुखांनी मला खोटेपणा शिकवला नाही, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे शब्दांचे खेळ करत आहेत. शब्द देऊन फिरवण्याची भाजपची वृत्ती असल्याचा आरोपही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. कोण खोटे बोलत आहे हे जनतेला काळत आहे असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे व शिवसेनेवर जे जे आरोप त्यांनी केले होते त्याला उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे यांनी उोन घेतला नाही असा आरोप केला होता त्याला उत्तर देताना ते म्हणाले मुख्यमंत्री खोटेपणा करत आहेत त्यामुळे मी त्यांच्याशी बोललो नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख