भाजपबरोबरची युती प्रामाणिकपणाची - उद्धव ठाकरे

भाजपबरोबरची युती प्रामाणिकपणाची - उद्धव ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्षाबरोबरची आमची युती ही प्रामणिकपणे केलेली युती आहे. आम्ही भाजपसोबत युती करायची नाही, तर काय 370 कलम रद्द करायला विरोध करणाऱ्या कॉंग्रेससोबत करायची का ? असा घणाघाती सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जगाने स्वीकारला आहे भूमीपुत्राला प्राधान्याने नोकरी देऊ हा विचार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर स्वीकारलाच आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात याबद्दलची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे. सत्ता आल्यावर आम्ही दहा रुपयात जेवण तर 1 रुपयात आरोग्य चाचणी करण्याची सुविधा देणार अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली. 


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना ते म्हणाले " राममंदिर आम्हाला सत्तेसाठी नकोय आमची राममंदिराशी बांधिलकी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न आहे. त्याबद्दल विशेष कायदा करून ते मंदिर उभे करावे अशी मागणी त्यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याच पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ईडीबद्दल पवार यांनी जो आरोप केला होता व भाजपचे सरकार सूडाचे राजकारण करत आहे असा आरोप केला होता त्याचा उल्लेख करून ते म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे राजकारण केले ते सुडाचे राजकरण होते. 

युतीबद्दल बोलताना ते म्हणाले ही युती निवडणुकीसाठी नाही तर ही युती महाराष्ट्राच्या हितासाठी आहे हे भगवे वादळ आहे, भाजपबरोबर युती केल्याने ज्यांच्या जागा सोडाव्या लागल्या त्यांची मी माफी मागतो पण लक्षात ठेवा या युतीसाठी काम करायचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com