औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा 93 फुट उंचीचा पुतळा व उद्यान उभारणार

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा 93 फुट उंचीचा पुतळा व उद्यान उभारणार

औरंगाबाद : शहरातील एमजीएम जवळच्या प्रियदर्शिनी उद्यानाच्या सतरा एकर जागेत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 93 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतले आहे. या कामाची 45 कोटी रुपयांची निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. 20) सांगितले. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने तीन वर्षापूर्वी घेतला होता. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने पाच कोटी रुपयांचा निधीही महापालिकेला दिला. मात्र पीएमसी नियुक्तीमध्येच महापालिकेचा बराच वेळ गेला. 

यासंदर्भात सोमवारी (ता.19) रात्री मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि स्मारक उभारण्याच्या कामाचे 45 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. ऑर्कहोम यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी तयार केलेला सविस्तर आराखडा अंतिम करण्यात आला आहे. 

हा आराखडा उद्धव ठाकरे यांना दाखविण्यात आला. पहिल्या टप्प्यात 28 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 17 कोटी रुपयांच्या कामांची निविदा काढण्याचे महापालिकेने ठरविले होते. मात्र, दोन्ही कामांसाठी एकच निविदा काढण्याची सूचना ठाकरे यांनी केली. 
17 एकरात होणार स्मारक 
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक 17 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. या जागेत बाळासाहेबांचा 93 फूट उंच पुतळा, म्युझियमही राहील. बाळासाहेबांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे त्यांची क्षणचित्रे चित्रफितीच्या रूपात दाखविण्याची सोयही या ठिकाणी करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com