ठाकरे सरकार कधीही गडगडून निवडणूक लागेल ! भाजपला आशा 

ठाकरे सरकार कधीही गडगडून निवडणूक लागेल ! भाजपला आशा 

मुंबई : राज्यातील तीन पक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कधीही गडगडून मुदतपूर्व निवडणुकीचा कार्यक्रम राज्यात जाहीर होईल, अशी आशा भाजपला आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असा आदेश कार्यकर्त्यांना भाजपच्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनात देण्यात येणार आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात यापुढे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई येथे पक्षाचे खासदार, आमदार, माजी मंत्री, महापौर आदींची बैठक झाली.

या बैठकीत राज्यातील पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच, आगामी काळात पक्षाचा विस्तार, पाया अधिक भक्‍कम करण्यासाठी नेमकी कोणती रणनीती आखली पाहिजे, यावर चर्चा झाली. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्याही अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. ते नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. या वेळी विविध प्रकारचे ठराव मांडले जाणार आहेत.

या वेळी नड्डा हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात दहा हजारांहून अधिक भाजप कार्यकर्ते हजर राहणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप होईल. 

भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com